भाजपा व वाएसपीतर्फे गुणवंतांचा सत्कार

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती
 
अमरावती, 
Felicitation of students युवा स्वाभिमान पार्टी व भारतीय जनता पार्टीच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा आमदार रवी राणा व भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते आज जाहीर सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला विद्यार्थ्यांसह पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमाला महापौर श्रीचंद तेजवानी, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन धांडे, उपमहापौर सचिन भेंडे, हरमन फिनोकेम कंपनीचे संचालक हरप्रीत मिनहास, युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शैक्षणिक बॅग, नोटबुक, पेन, वॉटर बॉटल, टिफीन बॉक्स यांसारख्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या मातांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या आईंना साडी भेट देण्यात आली.
 
satkar
 
नवनित राणा म्हणाल्या, अमरावतीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व रोजगारासाठी बाहेर जावे लागू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने अमरावती येथे अत्याधुनिक आयटी पार्कची निर्मिती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अमरावतीला शैक्षणिक व औद्योगिक केंद्र बनविण्याचा आमचा संकल्प आहे. आ. रवी राणा म्हणाले, जीवनात येणारी प्रत्येक संधी महत्त्वाची असते. शैक्षणिक जीवनात कधीही संधी चुकवू नका. सातत्य, मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकता. आजचा हा सन्मान तुम्हाला भविष्यात आणखी मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देईल. या गुणगौरव सोहळ्यामध्ये इतर क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन प्रतीक्षा डांगे यांनी केले. यावेळी निळकंठ कात्रे, सुनील राणा, जयंतराव वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, कमलकिशोर मालानी, ॲड.नंदेश अंबाडकर, प्रा.अजय गाडे, गंगाधर आवारे, समाधान वानखडे, सुखदेव तरडेजा, विनोद जायलवाल, संजय मुनोत, गणेशदास गायकवाड, प्रमोद येवतीकर, गटनेते नाना आमले, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नवले, शिक्षण सभापती ॲड. प्रीती रेवणे, झोन सभापती किशोर जाधव यांच्यासह अन्य नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.