मृगाने दिला दगा, आद्राने सावरले

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
Heavy rain खरीप हंगामातील महत्त्वाचे मृग नक्षत्र कोरडे गेले. परंतु, आद्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बरसलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. सोमवार आणि मंगळवारी परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी पिकांची लागवड करण्यात व्यस्त झाला आहे.

kharif 
 (संग्रहित छायाचित्र)
 
यावर्षी रोहिणी आणि मृग नक्षत्र अक्षरश: कोरडे गेले. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण करून खरीप हंगाम सजविण्यासाठी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करून ठेवली होती. वाट फक्त पावसाचीच होते. आद्रा नक्षत्रात गाढवाचे वाहन असून पहिल्या दिवशी गाढवाने दमदार हजेरी लावली. यंदा सोयाबीन पेक्षा कापसाचे क्षेत्रफळ अधिक राहण्याची शक्यता आहे. गतवर्षी सोयाबीन पिकाने दगा दिला होता. परिणामी, शेतकर्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली. कपाशीची लागवड करण्याकरिता मजूर मिळेनासे झाले. दोन दिवस झालेल्या समाधानकारक पावसाने आता शेतकरी लागवडीकडे वळला आहे.