स्मार्ट मिटर तात्काळ बदलवून साधे मिटर लावा

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
विधवा महिलेची आर्त हाक
 
हिंगणघाट, 
Hinganghat: Smart Meter साध्या मीटर पेक्षा स्मार्ट मिटरने फार जास्तीचे इलेक्ट्रिक बिल येत असून आपल्या आर्थिक परिस्थिती कडे बघता बिल भरण्याची माझी क्षमता नसल्याने एमआरव्हीव्ही कंपनीने त्वरित आपल्या घरी जुने मिटर लावावे अन्यथा इलेक्ट्रिक तारांना हात लावून संपूर्ण कुटुंबिया सोबत जीवन संपवू असा गंभीर इशारा तेलीपुरा चौक जुनी वस्ती येथील मंगला प्रेमलाल जोशी यांनी निवेदनातून दिला आहे.
 
 
meetar
 
येथील मंगला जोशी यांनी सहायक अभियंता एम. आर. व्ही. व्ही. कंपनी यांना कळकळीची विनंती केली आहे की, त्यांचे घरी ३९६०१०१९५५५२ या क्रमांकाचे साधे मिटर होते व त्यानुसार खर्च करीत असलेल्या वीज युनिटप्रमाणे बिल येत होत. परंतु, काही दिवसापुर्वी स्मार्ट मिटर लावण्यात आले. साधे मिटर असतांना ७२० रुपये बील आले होते आता स्मार्ट मिटर लावल्यानंतर २३६० हजार रुपये बिल आले..घरी कोणतेही नवीन इलेक्ट्रिक उपकरण न आणता मागच्या महिण्याच्या जवळपास तिप्पट बिल आले आहे. आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असुन घरातील चार जणांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे आपण इतके इलेक्टीक युनिट जाळले नसुन सुद्धा इतके जास्त आलेले बिल भरण्यास आपण असमर्थ आहे, त्यामुळे स्मार्ट मीटर काढून तीन दिवसाच्या आत जुने साधे मिटर बसवुन देण्यात यावे, अन्यथा इलेक्ट्रिक तारांना हात लावुन संपुर्ण कुटंबियासह जीवन संपविण्याशिवाय मला दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही, असा इशारा .मंगला जोशी यांनी निवेदनातून दिला आहे.