वाशीम,
accident khurana travels कारंजाकडून वाशीमच्या दिशेने येणार्या खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसला वाशीम शहराजवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे उड्डाणपुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ही घटना आज, २६ जून रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, खुराणा ट्रॅव्हल्सची बस अत्यंत भरधाव वेगात होती. रेल्वे उड्डाणपुलाजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून थेट विरुद्ध बाजूला गेली. रस्त्याच्या कडेला असलेली चिकन, मटण आणि पानपट्टीची टिन पत्र्यांची दुकाने चिरडत ही बस रस्त्याखाली उतरली. बसचा वेग इतका प्रचंड होता की, या धडकेत तीन-चार दुकानांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. ड्रायव्हर केबिनमध्ये लोखंडी रॉड घुसले. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाच्या काचा पूर्णपणे फुटल्या. दुकानांचे लोखंडी रॉड, पत्रे आणि लाकडी बल्ल्या काचा फोडून थेट ड्रायव्हर केबिनमध्ये घुसल्या.accident khurana travels यामुळे केबिनमध्ये बसलेले प्रवासी आणि चालक किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आले. घटनास्थळाला वाशीम शहर पोलिसांनी भेट देवून पंचनामा केला.