पाटबंधारे विभागाचे नवीन कामाचा फटका शेतकर्‍याला बसणार

शेतकरी दुरुस्तीसाठी झिजवत आहे पायर्‍या

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
सेलू,
irrigation canal repair issue बोर प्रकल्पाचे जुनाट झालेल्या कॅनलची नव्याने दुरुस्ती केली जात आहे. त्यातच काही ठिकाणी खोल भाग झाला असल्याने पावसाळ्याच्या दिवसात शेतकर्‍यांच्या शेतात पाणी पाझरणार असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
 
 

irrigation canal repair issue
घोराड येथील शेतकरी अजय माहूरे यांची शेती मौजा रिंगणी येथे आहे. त्यांच्या शेतालगत कोलगाव कॅनल आहे. कॅनलची नव्याने दुरुस्ती करण्यात आली. पण, ऐन शेताजवळ कॅनल खोल केला असून यामध्ये पावसाळ्यात किंवा धरणाचे पाणी सोडल्यानंतर ते पाणी साचणार आहे. त्यामुळे पाणी शेतात पाझरल्यास पिकाचे नुकसान होण्याची शयता असल्याने दोन महिन्यापासून सेलू व हिंगणी येथील पाटबंधारे कार्यालयात अर्ज करूनही त्यावर काही तोडगा निघाला नसल्याने शेतकर्‍यांना पाटबंधारे विभागाच्या पायर्‍या झिजवाव्या लागत आहे. irrigation canal repair issue कॅनलमध्ये पाणी साचून ते पाझरत असेल. त्यातून शेतकर्‍यांचे नुकसान होत असेल तर नूतनीकरण कशासाठी केले जात आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास याला अधिकारी जबाबदार राहतील असे कार्यालयाच्या पायर्‍या झिजवून त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने सांगितले.