जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये दमदार एंट्री

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
John Abraham's entry into cricket बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने क्रिकेट विश्वात मोठे पाऊल टाकले आहे. जॉन अब्राहम आता युरोपियन टी-20 प्रीमियर लीग (ETPL) मधील रॉटरडॅम डॉकर्स या फ्रँचायझीचा सह-मालक बनला आहे. त्याच्या या निर्णयामुळे क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.रॉटरडॅम डॉकर्सच्या मालकी गटात क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये व्यवस्थापकीय भागीदार मधुकर श्री यांच्यासोबत जॉन्टी ऱ्होड्स, फॅफ डु प्लेसिस, हेनरिक क्लासेन यांचा समावेश आहे.
 

jond 
 
युरोपियन टी-20 प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 26 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत ग्लासगो, ॲमस्टरडॅम, एडिनबर्ग, डब्लिन, बेलफास्ट आणि रॉटरडॅम या सहा शहरांतील फ्रँचायझी सहभागी होणार आहेत. संपूर्ण स्पर्धेत एकूण 32 सामने खेळले जातील.या लीगचे प्रमुख उद्दिष्ट आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्ये क्रिकेटला अधिक लोकप्रिय करणे आणि खेळाच्या विकासाला गती देणे हे आहे. युरोपमध्ये क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी ही लीग महत्त्वाची भूमिका बजावेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.
 
 
सह-मालक बनल्यानंतर जॉन अब्राहमने क्रिकेटबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली. क्रिकेटमध्ये लोकांना जोडण्याची, प्रेरणा देण्याची आणि नवीन संधी निर्माण करण्याची मोठी ताकद असल्याचे त्याने सांगितले. तसेच युरोपमध्ये क्रिकेट झपाट्याने वाढत असून रॉटरडॅम डॉकर्सकडे मजबूत नेतृत्व आणि मोठी महत्त्वाकांक्षा असल्याचेही त्याने नमूद केले.ETPL चे सह-संस्थापक Abhishek Bachchan यांनी जॉन अब्राहमचे स्वागत केले. खेळाबद्दलची त्याची आवड आणि क्रीडा व्यवसायातील अनुभव रॉटरडॅम डॉकर्ससाठी मोठी ताकद ठरेल, असे त्यांनी सांगितले. युरोपियन टी-20 प्रीमियर लीगच्या विविध फ्रँचायझींमध्ये Steve Waugh, Rahul Dravid, Matthew Hayden यांसारख्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा सहभाग आहे. त्यामुळे लीगच्या पहिल्याच हंगामाबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.