विद्यापीठाच्या प्रा. डॉ. अपर्णा भाके यांचे टोकीयोत व्याख्यान

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
गडचिरोली,
dr aparna bhake टोकियो, जपान येथील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल येथे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या पदव्युत्तर शैक्षणिक भौतिकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अपर्णा भाके यांनी ’भौतिकशास्त्र आणि गणित यातील आंतरविद्याशाखीय घटक’ यावर नुकताच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत व्याख्यानमाला सादर केली.
 
 

dr aparna bhake 
 
 
या व्याख्यानांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विषयांच्या एकात्मिक अध्ययनाविषयी अधिक सखोल समज विकसित करणे हा होता, ज्यामुळे ते त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीबाबत तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रम आणि शाखा निवडीसंदर्भात अधिक माहितीपूर्ण आणि योग्य निर्णय घेऊ शकतील. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्‍नाचे निरसनही त्यांनी केले.
जपानमधील टोकियो सह नारा, क्योटो, ओसाका, हिरोशीमा, अतामी, इज्यू येथील ऐतिहासिक आणि नैसर्गिक अशा विविध ठिकाणीही त्यांनी भेट दिली आणि सांस्कृतिक आदानप्रदान केले.dr aparna bhake जपान प्रगत, विकसित, नेटका, स्वच्छ, सुंदर देश असल्याचे नमूद केले. प्रत्येक भारतीयाने एकदा तरी ’ आपला देश स्वच्छ कसा निर्माण करता येऊ शकतो ’ हे बघावे आणि शिकावे असे आवाहन ही त्यांनी केले.