मुंबई
MCOCA demand राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने खरीप पेरण्यांना वेग आला असून शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे, खते आणि शेती साहित्य खरेदी करत आहेत. मात्र याच काळात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीचा धोका वाढला आहे.
पावसाळी अधिवेशनात उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत बोगस बियाणे व खतांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊन हा काळाबाजार कायमचा बंद करण्यासाठी प्रभावी कायदेशीर उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सरकारला सांगितले.दरम्यान, कृषी विभागानेही बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार आणि अनधिकृत एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांच्या विक्रीविरोधात मोहीम सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून, अनधिकृत HTBT बियाण्यांचा साठा आढळल्यास पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.याशिवाय, उद्धव ठाकरे यांच्या २८ जूनच्या धाराशिव दौऱ्यापूर्वी आमदार प्रवीण स्वामी यांनी सोशल मीडियावर "फुटीने बदलतात ते आकडे… शिवसैनिकांची निष्ठा नाही!" असा संदेश देणारे बॅनर प्रसिद्ध केले. या बॅनरमधून त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे.