ॲमेझॉनच्या मित्राने दिला चाकू... लोकल हत्याकांडातील धक्कादायक माहिती समोर

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
मुंबई
local train incident पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली लोकल ट्रेनमध्ये मंगळवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. केवळ दरवाजा बंद करण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद थेट जीवघेण्या हल्ल्यात परिवर्तित झाला आणि त्यात मयंक लोहार याचा मृत्यू झाला. या प्रकरणात रोशन सुवर्णा याला पोलिसांनी २४ तासांच्या आत पनवेल परिसरातून अटक केली आहे.
 

mumbai local train incident 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीवली लोकलमध्ये प्रवासादरम्यान रोशन सुवर्णा आणि मयंक लोहार यांच्यात वाद झाला. हा वाद काही क्षणांतच चिघळला आणि संतापाच्या भरात रोशन याने आपल्या बॅगेत ठेवलेला चाकू बाहेर काढत मयंकच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला मयंक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
या हत्येनंतर आरोपी रोशन सुवर्णा हा बोरीवली स्थानकात उतरून घटनास्थळावरून पसार झाला होता. त्यानंतर त्याने अंधेरी आणि मिरा रोड रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत पोलिस तपासात महत्त्वाचा धागा उपलब्ध करून दिला. या फुटेजमध्ये त्याच्या शर्टवरील चिन्हाच्या आधारे पोलिसांनी त्याची ओळख पटवली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याच्या मिरा रोड येथील घरापर्यंत पोहोचले. मात्र तोपर्यंत तो घरातून फरार झाला होता.
दरम्यान, पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांमार्फत संपर्क साधल्यानंतर अखेर त्याने शरण येण्यास होकार दिला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर आरोपी मंगळुरूला पळून जाण्याच्या तयारीत होता आणि त्यासाठी त्याने बसचे तिकीटही काढले होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याला पनवेल परिसरातून ताब्यात घेत अटक केली.
चौकशीदरम्यान चाकू local train incident  कुठून आला याबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो चाकू त्याच्या एका मित्राने दिला होता, जो ॲमेझॉनमध्ये काम करत असल्याचे सांगितले जात आहे. घरकामासाठी वापरण्यासाठी हा चाकू काही दिवसांपूर्वी देण्यात आला होता, मात्र तो बॅगेतच राहिल्याने आरोपी त्याबाबत विसरला होता. वादाच्या वेळी अचानक बॅगेत चाकू असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने त्याचाच वापर केल्याचे समोर आले आहे.
 
 
अटकेनंतर आरोपीने पोलिसांना पहिला प्रश्न मयंकच्या प्रकृतीबाबत विचारला होता. त्यानंतर त्याने इंटरनेटवर शोध घेत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, मयंकच्या मृत्यूबाबत चुकीची माहिती समोर आल्याने तो गोंधळून गेला. आरोपीने अनावश्यक तणावात चुकीचे पाऊल उचलू नये यासाठी पोलिसांनी त्याला सुरुवातीला मयंक उपचाराधीन असल्याची माहिती दिली होती. नंतर त्याला बोरीवली पोलीस ठाण्यात local train incident  आणल्यानंतर मयंकचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले.दरम्यान, मुंबईतील या घटनेने प्रवासी सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ क्षणिक रागातून घडलेल्या या प्रकारामुळे एका तरुणाचा जीव गेला असून आरोपी पोलिस कोठडीत आहे. पुढील तपास बोरीवली पोलिसांकडून सुरू आहे.या घटनेबरोबरच इतर काही घडामोडींमध्ये राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चांना उधाण आले असून विविध माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.