नागपूर,
mega blood donation camp at mihan मिहान, नागपूर येथे मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मिहान एमआयडीसी परिसरात आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात विशेषतः महिला, युवती तसेच युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत रक्तदान केले. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठी मदत होणार असून, शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी रक्तदात्यांचे आणि आयोजकांचे कौतुक करण्यात येत आहे.
सौजन्य: सुहास खरे, संपर्क मित्र