कंत्राटी तांत्रिक कामगारांचा बोनस तातडीने द्या: महावितरणकडे निवेदन

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
नागपूर,
mahavitaran महावितरणच्या विविध उपकेंद्रे व वितरण केंद्रांमध्ये क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आणि स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि.मार्फत कार्यरत तांत्रिक कंत्राटी कामगारांचा ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील प्रलंबित बोनस तातडीने अदा करावा, अशी मागणी तांत्रिक कामगार युनियन (रजि. क्र. ५०५९) प्रणित तांत्रिक ॲप्रेंटिस, कंत्राटी कामगार (कर्म.) असोसिएशनने केली आहे.
 
mahavitaran
 
यासंदर्भात महावितरणचे संचालक (मानव संसाधन), प्रकाशगड, मुंबई यांना निवेदन देण्यात आले. बोनस हा कामगारांचा कायदेशीर हक्क असून त्याच्या विलंबामुळे अनेक कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदार कंपन्यांना तातडीने निर्देश देऊन प्रलंबित बोनस अदा करावा व बोनस वितरणाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी केली. या मागणीला असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र