शेतकर्‍यांच्या मदतीला धावून येणारे प्रा. नंदलाल पवार

१५ वर्षांपासून लाखो रुपयांचे बिनव्याजी आर्थिक वाटप

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
मंगरुळनाथ,
prof nandlal pawar शेती हा देशाचा कणा मानला जातो, मात्र आजही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींशी झुंज देत आहेत. विशेषतः पेरणीच्या हंगामात बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी पैशांची मोठी गरज भासते. अशा वेळी अनेक शेतकर्‍यांना सावकारांचे दरवाजे ठोठवावे लागतात, तर काहींना आपल्या घरातील दागिने गहाण ठेवून शेतीची कामे उरकावी लागतात. शेतकर्‍यांच्या या वेदना आणि संघर्ष जवळून अनुभवलेल्या मंगरूळपीर तालुक्यातील चिखलगड येथील प्रा. नंदलाल पवार यांनी गेल्या १५ वर्षांपासून एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
 

prof nandlal pawar 
 
 
शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात आधार मिळावा, त्यांची पेरणी पैशाअभावी खोळंबू नये आणि सावकारीच्या विळख्यात ते अडकू नयेत या उदात्त हेतूने प्रा. नंदलाल पवार दरवर्षी लाखो रुपयांची बिनव्याजी आर्थिक मदत करतात. कोणतीही प्रसिद्धी, राजकीय हेतू किंवा स्वार्थ न ठेवता केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू असलेले हे कार्य आज हजारो शेतकर्‍यांसाठी आशेचा किरण ठरले आहे. पेरणीचा हंगाम सुरू होताच अनेक गरजू शेतकरी त्यांच्या संपर्कात येतात. शेतकर्‍यांची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर प्रा. पवार त्यांना बिनव्याजी आर्थिक मदत उपलब्ध करून देतात. त्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळतो. सावकारांचे वाढते व्याज, बँकांच्या अटी आणि आर्थिक संकटाच्या काळात प्रा. पवार यांची ही मदत शेतकर्‍यांसाठी संजीवनी ठरत आहे.
कोरोनाच्या काळातही त्यांनी गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला होता. अन्नधान्य वाटप, आर्थिक मदत, रुग्णांना सहकार्य अशा विविध माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली. कोरोना संपल्यानंतरही त्यांची सेवा थांबली नाही. आजही एखाद्या कुटुंबावर संकट आले, शेतकर्‍याला मदतीची गरज भासली किंवा गरीब विद्यार्थ्याला शैक्षणिक सहाय्य हवे असेल तर प्रा. नंदलाल पवार मदतीसाठी तत्पर असतात. त्यांच्या या कार्यामुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्यातून वाचले असून आत्मविश्वासाने शेती करू शकले आहेत.
प्रा. नंदलाल पवार यांची शेतकरी, विद्यार्थी, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेली आत्मीयता आणि सेवाभाव यामुळेच ते अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.prof nandlal pawar शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद आणि समाधान पाहणे हाच आपल्या कार्याचा खरा मोबदला असल्याची भावना ते व्यक्त करतात. मूळ गाव चिखलगड येथील बरेचसे गरीब व होतकरू शेतकर्‍यांना, जवळपास मागील १४-१५ वर्षा पासून सतत बिनव्याजी पैसे देतात. सर्व शेतकरी न सांगता शेतातील पीक आल्या बरोबर पैसे परत करून देतात.