बुलढाणा,
rainfall जिल्ह्यात आज (२६ जून) सकाळी संपलेल्या २४ तासांत सरासरी ८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे १ जूनपासून आजअखेर जिल्ह्यात एकूण ८७८.५ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या ८.८७ टक्के आहे.
आजच्या पावसात जळगाव जामोद तालुयात सर्वाधिक ३७.९ मि.मी., संग्रामपूर तालुयात २६.५ मि.मी., शेगाव येथे ८.० मि.मी., खामगाव व मोताळा येथे प्रत्येकी ७.७ मि.मी., मलकापूर येथे ७.० मि.मी., सिंदखेड राजा येथे ५.६ मि.मी., नांदुरा येथे ५.७ मि.मी., लोणार येथे ५.८ मि.मी., देऊळगाव राजा येथे २.४ मि.मी., चिखली येथे ०.४ मि.मी. आणि मेहकर येथे ०.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. बुलढाणा तालुयात आज पावसाची नोंद झाली नाही. १ जूनपासून आजपर्यंत सर्वाधिक एकूण पाऊस मोताळा तालुयात ९२.९ मि.मी. झाला असून, त्यापाठोपाठ जळगाव जामोद येथे ८८.० मि.मी., बुलढाणा येथे ८६.३ मि.मी. आणि मेहकर येथे ८२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.