केंद्रीय आयुषमंत्री ना. जाधव यांच्या पाठपुराव्याला यश
बुलढाणा,
Recruitment in the Health Department बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील ट्रॉमा केअर सेंटर, चिखली येथील उपजिल्हा रुग्णालय आणि साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयातील पदांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे. केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी यासंदर्भात राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता, त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला आहे. नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र आणि सरकारच्यावतीने आरोग्य सेवेत राज्य सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येत आहे. मनुष्यबळ वाढवून ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्यसेवा देण्या साठी राज्य सरकारच्यावतीने २५९ आरोग्यसंस्थेसाठी आवश्यक पदाच्या आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीने नवनिर्मित श्रेणी वर्धित करण्यात मान्यता देण्यात आली रुग्णसंस्थेसाठी पदनिर्मिती आहे.
शिवाय राज्यातील पुणे, अहिल्यानगर, नंदुरबार, सिंधुदुर्ग येथे सुरू करण्यात आलेल्या ३० खाटांच्या आयुष रुग्णालयातील नियमित पद भरतीला मान्यता देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील उपजिल्हा रुग्णालय, सिदखेडराजा तालुयातील साखरखेर्डा येथे तालुयातील कोथळी केंद्राच्या नवीन ग्रामीण रुग्णालतील नव्याने पद निर्मितीला तसेच नवीन बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मोताळा पदनिर्मितीला राज्य शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात हे आरोग्य विभाग अंतर्गत मोठ्या प्रमाणात नियमित पदभरती आगामी काळात होणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागामध्ये नियमित पदभरतीला मान्यता देण्यात आल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय आयुष, आरोग्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे राज्यातील आरोग्य विभागात नव्याने नियमित पदभरती व्हावी यादृष्टीने राज्य शासनाची समन्वय साधून होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे राज्य शासनाच्या वतीने २४ जून रोजी ५० टक्क्यापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित श्रेणी वर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला झाला असून आगामी काळात आरोग्य विभागात ही पदभरती होणार असल्याने अनेकांना रोजगाराची संधी मिळणार आहे.