वर्धा :
Srujan Musical सृजन म्युझिकल व जय महाकाली शिक्षण वर्धा द्वारा आयोजित सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मभूषण स्व. सुमन कल्याणपूर यांच्यावर आधारित भावपूर्ण स्वर सुमनांजली हा श्रद्धांजली गीतांचा रहे ना रहे हम हा कार्यक्रम शनिवार २७ रोजी सायंकाळी ७ वाजता शिवशंकर सभागृह अग्निहोत्री कॉलेज कॅम्पस रामनगर वर्धा येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी स्व. सुमन कल्याणपूर यांना त्यांच्याच गायलेल्या गीतांद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गायक म्हणून अनघा रानडे, सुरभी ढोमणे, विश्वास रानडे, अवंतिका ढूमने, अरुण सुरजुसे, सुनील रहाटे, अशोक तुरक्याल आणि शशिकांत बागडदे स्वरसाज चढवणार आहेत. या कार्यक्रमाचा वर्धेकर रसिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री व सृजनचे शशिकांत बागडदे यांनी केले आहे.