गोंदियाच्या चार उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
गोंदिया, 
Transfers of police officers राज्य सरकारने पोलिस उपअधीक्षक आणि समकक्ष दर्जाच्या तब्बल 115 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पदस्थापना जाहीर केल्या आहेत. यात गोंदिया जिल्ह्यातील चार उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांचे स्थानांतरण करण्यात आले आहे. गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्हे, पोलिस आयुक्तालये आणि विशेष शाखांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या गृह विभागाने निर्णय घेत 23 जून रोजी सर्वच स्तरातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले असून गेल्या काही महिन्यांपासून पेंडिंग असलेल्या पोलिस उपअधीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
 
 
police
 
यात गोंदिया जिल्ह्यातील गोंदियाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी ज्ञानदेव बानकर यांचे स्थानांतरण पिंपरी चिंचवड येथे सहाय्यक पोलिस आयुक्त पदी करण्यात आले आहे. तर तिरोडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल उमाकांत झरकर यांची चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी विभागात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर आमगावचे प्रमोद मयाराम मडामे यांचे नागपूर जिल्ह्यातील कामठी आणि देवरीचे विवेक हरीदास पाटील यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज विभागात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून स्थानांतरण करण्यात आले आहे.