मुंबई
welcome to the jungle अक्षय कुमार यांची बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाली असून, पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. ॲक्शन, कॉमेडी, रोमांस, ड्रामा आणि सस्पेन्सने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला असून, थिएटरमधून बाहेर पडताना अनेकांनी आपली पहिली प्रतिक्रिया आणि रिव्ह्यू व्यक्त केले आहेत.
चित्रपटाची कथा एका भव्य स्टारकास्ट आणि विनोदी घटनाक्रमाभोवती फिरते, ज्यात परेश रावल एक बनावट चित्रपट बनवण्याची योजना आखतात आणि त्याचे शूटिंग जंगलात सुरू केले जाते. कथानकात मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा परेश रावल यांची संपूर्ण टीम एका गावात पोहोचते आणि तेथील ग्रामस्थ त्यांना खरे सैन्याचे जवान समजतात, जे त्यांच्या संरक्षणासाठी आले आहेत, असा त्यांचा समज होतो.
चित्रपटात कलाकारांच्या वास्तविक welcome to the jungle जीवनाशी संबंधित काही हलकेफुलके आणि मजेशीर संदर्भही समाविष्ट करण्यात आले आहेत, असेही दिसून येते. प्रदर्शना आधीच या चित्रपटातील गाणी चर्चेत राहिल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या होत्या.थिएटरबाहेरून समोर आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये प्रेक्षक चित्रपटाचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. काहींनी हा चित्रपट “सुपरहिट ठरणार” असल्याचे म्हटले, तर काहींनी त्याला “मस्त आणि टॉप लेव्हल एंटरटेनमेंट” असे वर्णन केले. काही लहान मुलांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले की त्यांना हा चित्रपट खूप आवडला असून सर्व कलाकार, दृश्ये आणि विनोदी संवाद अतिशय मजेशीर वाटले. अनेक प्रेक्षकांनी असेही म्हटले की चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही कंटाळवाणा वाटत नाही आणि पूर्णपणे मनोरंजक अनुभव देतो.या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा प्रचंड आणि भव्य कलाकारांचा संच. अक्षय कुमार यांच्यासोबत सुनील शेट्टी, परेश रावल, जॉनी लिव्हर, राजपाल यादव, अरशद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी, जॅकी श्रॉफ, दलेर मेहंदी, मीका सिंग, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पाटनी, उर्वशी रौतेला, फरीदा जलाल, कृष्णा अभिषेक, मुकेश तिवारी, यशपाल शर्मा, विंदू दारा सिंग, किरण कुमार, जाकिर हुसैन, पंकज धीर, पुनीत इस्सर, किकू शारदा, फिरोज खान, सुदेश बेरी आणि व्रीही कोडवारा यांसारखे अनेक कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकत आहेत.