भयानक...मोहरम मिरवणुकीत सापडल्या 14,900 विषारी कॅप्सूल!

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
मुंबई,
14,900 toxic capsules found in Mumbai मुंबईत मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषाच्या तब्बल 14,900 कॅप्सूल पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणामागे मोठ्या कटाचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे शहरात सुरक्षा यंत्रणांची सतर्कता वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी एका तरुणाला संशयास्पद हालचाली करताना ताब्यात घेतले. तो चार जणांना या विषारी कॅप्सूल वाटत असल्याचे निदर्शनास आले. तातडीने कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली. प्राथमिक चौकशीत या प्रकरणाचा तपास अधिक गंभीर दिशेने जात असल्याचे संकेत मिळाले आहेत.डीसीपी जयंत मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान संबंधित व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. चौकशीत तो विनापरवाना या कॅप्सूल विक्री आणि वितरण करत असल्याचे स्पष्ट झाले. याचदरम्यान पहाटे 4 वाजता एका व्यक्तीला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाल्याची माहितीही पोलिसांना मिळाली, ज्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले.
 
 
a२ ४ ४ ३ ५
 
आरोपीचे नाव फयाज असून तो पुण्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तो पेंट व्यवसायाशी संबंधित आहे. त्याने झिंक फॉस्फाईड या अत्यंत विषारी पदार्थाची सुमारे 50 किलो ऑर्डर दिल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या पदार्थाचा वापर कॅप्सूल तयार करण्यासाठी करण्यात येत होता. पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, या योजनेअंतर्गत प्रत्येकी एक ग्रॅम विष भरलेल्या कॅप्सूल तयार करून त्यांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्याचा कट रचला गेला होता. आरोपीने 2025 मध्ये इराण आणि इराकचा प्रवास केल्याची माहितीही तपासात मिळाली आहे. या संपूर्ण प्रकरणात 14,900 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून सुमारे 30,000 कॅप्सूल तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही समोर आले आहे. सुदैवाने या कॅप्सूलचे वितरण अद्याप झालेले नाही.