बस पकडण्याची घाई ठरली 'शेवटची धाव'

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
अंबाजोगाई,
ambajogai बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बसस्थानकावर बसमध्ये जागा मिळवण्याच्या घाईत झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस अंबाजोगाई बसस्थानकातून निघत असताना प्रवाशांमध्ये जागा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू होती. या गोंधळात काही प्रवासी बसच्या मागे धावत होते.
 
ambajogai
 
याच वेळी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढळेगाव येथील रहिवासी बालाजी देवकाटे हे बस पकडण्यासाठी धावत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट बसच्या मागच्या चाकाजवळ पडले. अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
 
प्राथमिक माहितीनुसार, काही अधिकाऱ्यांनी हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली असली तरी अपघात नेमका कसा घडला याबाबत तपास सुरू आहे. बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली असून त्यातून घटनेची भयावहता स्पष्ट दिसत आहे. या दुर्घटनेमुळे अंबाजोगाई बसस्थानकावर एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.