बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी...जुलैमध्ये बँकांना 12 दिवस सुट्टी!

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Banks closed for 12 days in July जुलै 2026 महिन्यात देशभरातील बँका एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत. चार रविवार, दोन शनिवार आणि विविध राज्यांतील स्थानिक सणांमुळे अतिरिक्त सहा दिवस बँकांना सुट्टी असेल. विशेष म्हणजे, वर्षातील इतर महिन्यांच्या तुलनेत जुलैमध्ये तुलनेने कमी सुट्ट्या असल्या तरी अनेक राज्यांमध्ये स्थानिक सणांमुळे बँकिंग सेवांवर परिणाम होणार आहे.रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, 5, 12, 19 आणि 26 जुलै रोजी रविवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील. याशिवाय 11 जुलैला दुसरा शनिवार आणि 25 जुलैला चौथा शनिवार असल्यामुळेही सर्व बँकांना सुट्टी असेल.
 
 
bank holidaysBanks closed for 12 days in July
 
 
स्थानिक सणांमुळे काही राज्यांमध्ये अतिरिक्त सुट्ट्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. 6 जुलै रोजी एमएचआयपी दिनानिमित्त मिझोरममधील सर्व बँका बंद राहतील. 9 जुलै रोजी बेह देंखलाम उत्सवानिमित्त मेघालयात बँकिंग सेवा बंद असेल.16 जुलै रोजी ओडिशामध्ये रथयात्रा, उत्तराखंडमध्ये हरेला आणि मणिपूरमध्ये कांग महोत्सवानिमित्त बँका बंद राहतील. 17 जुलै रोजी महान क्रांतिकारक यू तिरोट सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेघालयातील बँकांना सुट्टी असेल.
 
 
18 जुलै रोजी द्रुकपा त्शे-झी निमित्त सिक्कीममधील सर्व बँका बंद राहतील. हा दिवस बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर 22 जुलै रोजी खारची पूजेनिमित्त त्रिपुरातील बँका बंद राहतील.ग्राहकांनी बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार आणि इतर शाखा-आधारित सेवांसाठी सुट्ट्यांचे नियोजन करूनच बँकेत जाणे योग्य ठरेल. मात्र, ऑनलाइन बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.