वर्धा ते शेगाव-शिर्डीसाठी नवीन बससेवा सुरू

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
चालक वाहकाचा पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते सत्कार
 
वर्धा, 
Bus from Wardha to Shegaon-Shirdi जिल्ह्यातील साईभक्त आणि गजानन महाराज भक्तांच्या सोयीसाठी वर्धा ते शेगाव आणि वर्धा ते शिर्डी या मार्गांवर स्वतंत्र नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या बससेवेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते झाला. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, संत सयाजी महाराज, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ, साई मंदिरचे विश्वस्त डॉ. विजय बोबडे, चंद्रशेखर राठी, मोन्टी राठी, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे, आगार व्यवस्थापक युधिष्ठिर रामचवरे, विभागीय भंडाराधिकारी करुणा वानखेडे, विभागीय वाहतूक अधीक्षक उजवणे प्रामुख्याने उपस्थित होते.
 

Bus 
 
वर्धा येथील मुख्य बसस्थानकामध्ये वर्धा ते शेगाव आणि वर्धा ते शिर्डी नवीन बससेवेचा शुभांरभ व राजमाता जिजाऊ बस लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना शहर आणि तालुयांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम एसटी महामंडळ करत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी केले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साईभक्त आणि गजानन महाराजांचे भक्त आहेत. दरवर्षी हजारो भाविक शेगाव आणि शिर्डी येथे दर्शनासाठी जात असतात. भाविकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे बससेवेची मागणी करण्यात आली होती. त्यांनी तत्काळ सकारात्मक निर्णय घेत ही सेवा उपलब्ध करून दिली, असे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
 
 
जिल्ह्यातील नागरिक व वयोवृद्धांना संताचे दर्शन करण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्री नागरिकांनी शेगाव-शिर्डी बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी केले. यावेळी डॉ. विजय बोबडे, सयाजी महाराज यांनीही मनोगत व्यत केले. यावेळी साई सेवा मंडळाच्या वतीने चालक आणि वाहकांचा सत्कार करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत तीन पदके पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढविणार्‍या ईशिता रहाटे हिचाही पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.