मुख्यमंत्री बळीराजा पांदनरस्त्याचे भूमिपुजन

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
समुद्रपूर, 
Chief Minister Baliraja Pandanastya आ. समीर कुणावार यांच्या नेत्रुत्वात व मार्गदर्शनात शेतकर्‍यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ता योजनेमध्ये प्रत्येक वर्षी कांढळी सर्कलमध्ये २५ किमीच्या शेत पांदण करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. वायगाव (गोंड) ते सालाई पांदण १.५ किमी रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
 
 
bhumipoojan
 
जिपचे माजी सदस्य योगेश फुसे यांच्या हस्ते या पांदन रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिपच्या माजी सदस्य चंद्रकला धुर्वे, माजी उपसभापती पांडुरंग पिचकाटे, शंकर राऊत, खेमराज पिचकाटे, सागर उइके, आदी उपस्थित होते. परिसरातील शेतकर्‍यांनी आ. कुणावार यांचे आभार मानले.