चॉकलेट कंपनीला भीषण आग

शॉर्ट सर्किटचा प्राथमिक संशय

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
उल्हासनगर
chocolate factory fire उल्हासनगरच्या श्रीराम चौक परिसरातील एका चॉकलेट उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. आगीमुळे परिसरात घनदाट धुराचे लोट पसरल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
 

chocolate factory fire accident, 
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तत्काळ बचावकार्य हाती घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
प्राथमिक तपासात शॉर्ट chocolate factory fire  सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आगीत कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा माल तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले असून त्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच परिसरातील रहिवाशांनाही कोणतीही गंभीर जीवितहानी झालेली नसल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, आगीचे नेमके कारण आणि इतर बाबींचा सखोल तपास अग्निशमन दल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून सुरू आहे.