महेश नवमीनिमित्त संस्कृती, पर्यावरण आणि स्त्रीशतीचा त्रिवेणी संगम
वर्धा,
Environmental protection प्लॅस्टिक आणि डिस्पोजेबलच्या वस्तूंमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. प्लॅस्टिक हे मानवी सभ्यतेच्या कपाळावरील डाग आणि डिस्पोजेबल वस्तू पृथ्वीच्या छातीवरील जखमा आहेत. ज्या ताटात तुम्ही जेवता, त्यालाच छिद्र पाडता, ही कसली आधुनिकता, असा प्रश्न उपस्थित करीत पर्यावरण संरक्षण हा केवळ भाषणांचा विषय नसावा, तर तो आपल्या आचरणाचा एक भाग असावा, असे आवाहन प्रेरक वता व ज्येष्ठ संपादक किरण मुंदडा यांनी केले.
महेश्वरी मंडळाच्या वतीने महेश नवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर भूतडा होते. व्यासपीठावर माहेश्वरी मंडळाचे विश्वस्त दामोधर दरक, चारही संघटनांचे अध्यक्ष सुनीता राठी, ऋषभ जाजू आणि साक्षी चितलांगे उपस्थित होते. किरण मुंदडा पुढे म्हणाल्या की, शब्द आणि कृतीत कोणताही भेद नसावा. महिलांनी साडी नेसावी, मुलांना अध्यात्माशी जोडावे, शाश्वत मूल्यांचा स्वीकार करावा आणि चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले. आधुनिक कुटुंबांमध्ये संवादाचा वाढता अभाव हे सर्व विकृतींचे मूळ आहे. महिला कुटुंबाचा कणा आणि मूल्यांच्या पहिल्या शिक्षिका आहेत. त्यामुळे महिलांनी नवीन पिढीशी संवाद साधून सामाजिक ऐय मजबूत केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमादरम्यान गोसेवा पुरस्कार प्रकाश भूतडा आणि शारदा चांडक, रतदाता पुरस्काराने नरेश चांडक यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा माहेश्वरी संघटनेचे नवनियुत अध्यक्ष सीए राजेंद्र भूतडा आणि शोभा गांधी यांचाही सत्कार केला. यावेळी राजेंद्र भुताडा यांनी पुढील तीन वर्षांच्या सेवेचा आराखडा सादर केला. दरम्यान, माता गाय या निबंध स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मंडळाचे समन्वयक राजकुमार जाजू यांनाही गौरविण्यात आले. तर प्रा. ललित राठी यांच्या वतीने समाजातील २० गुणवंत विद्यार्थ्यांना पदके देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी महिला चर्चासत्र आणि परिसंवाद घेण्यात आला. संचालन हिना राठी यांनी केले. सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. नवयुवक मंडळाने १२ ज्योतिर्लिंग यात्रा आणि रामजी की सेना यांचे सादरीकरण केले.