गडचिरोली,
Gadchiroli DMF fund controversy जिल्हाधिकार्यांच्या स्वाक्षरीचा कथित गैरवापर करून जिल्हा खनिज प्रतिष्ठान संदर्भातील प्रशासकीय मंजुरी आदेश तयार करण्यात आल्याच्या आरोपांमुळे जिल्ह्यात गंभीर चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी तसेच सत्य जनतेसमोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी केली आहे.
गेडाम म्हणाले की, या प्रकरणातील आरोपांमध्ये तथ्य असेल आणि चौकशीत बनावट स्वाक्षरी, कागदपत्रांचा गैरवापर किंवा शासनाची दिशाभूल झाल्याचे सिद्ध झाले, तर दोषींवर दया न दाखवता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी हा आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा व आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी महत्त्वाचा निधी आहे.या निधीच्या वापराबाबत कोणत्याही प्रकारचा संशय निर्माण होणे ही गंभीर बाब असून, प्रशासनावरील जनतेचा विश्वास अबाधित राहणे आवश्यक आहे.
या प्रकरणात कोणताही अधिकारी, Gadchiroli DMF fund controversy कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरकठोर कारवाई करण्यात यावी तसेच चौकशी पारदर्शक पद्धतीने करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही अथवा चौकशीत कोणताही हस्तक्षेप किंवा दडपशाही करण्याचा प्रयत्न झाला, तर शिवसेना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा गेडाम यांनी दिला.