प्रत्येक बालकाला ‘दोन थेंब’ पाजून पोलिओमुक्त गोंदियाच्या संकल्पाला बळ द्या!

- जि. प. अध्यक्ष भेंडारकर यांचे पालकांना आवाहन

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
गोंदिया,
Gondia Pulse Polio राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात 25 जून रोजी जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी भेंडारकर यांनी रविवारी 28 जून रोजी होणार्‍या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आढावा घेत नागरिकांना पोलिओमुक्त गोंदियाच्या संकल्पाला बळ देण्याचे आवाहन केले.
 

Gondia Pulse Polio  
प्रसंगी जि. प. उपध्यक्ष सुरेश हर्षे, जि.प. सदस्य, रचना गहाणे, छाया नागपुरे, गीता लिल्हारे, वैशाली पंधरे, सुधा रहांगडाले, प्रवीण पटले, डॉ. भूमेश्वर पटले, रूपेश कुथे, डॉ. अरविंदकुमार वाघमारे, डॉ. विनोद चव्हाण, विजय आखाडे, डॉ. निरंजन अग्रवाल, मिलिंद नंदागवळी, प्रशांत खरात आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना भेंडारकर यांनी भारताने पोलिओमुक्त देशाचा मान मिळवला असला तरी जगातील काही देशांमध्ये अद्याप पोलिओचा धोका कायम आहे. त्यामुळे हा धोका पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला 28 जून रोजी पोलिओचे ‘दोन थेंब’ अवश्य पाजावेत. पोलिओमुक्त भारत कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ही राष्ट्रीय जबाबदारी समजून सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 28 जून रोजी Gondia Pulse Polio  आपल्या घरातीलच नव्हे तर शेजारील आणि नातेवाईकांच्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओचे ‘दोन थेंब’ अवश्य पाजावेत. आपल्या मुलांचे निरोगी भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही अत्यंत आवश्यक आणि जबाबदारीची बाब असल्याचे ते म्हणाले. बैठकीत मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन, बूथ व्यवस्था, मोबाईल पथके, जनजागृती उपक्रम तसेच दुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.