गोंदियात ‘सारस’चे अस्तित्व ‘बळकट’!

गोंदिया-बालाघाट मिळून 82 सारस पक्ष्यांची नोंद

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
गोंदिया
Gondia Sarus Crane जिल्ह्यातील जैवविविधतेसाठी दिलासादायक ठरलेल्या वार्षिक सारस पक्षी गणना-2026 मध्ये गोंदिया जिल्ह्यात 32 सारस पक्ष्यांची नोंद झाली असून सीमेलगतच्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात 50 सारस पक्षी आढळले आहेत. गोंदिया व बालाघाट वनविभाग, सेवा संस्थान तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 20 जून रोजी ही प्रगणना करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून तब्बल 82 सारस पक्ष्यांची नोंद झाल्याने या दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
 

Gondia Sarus Crane Population Rises 
गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा आणि आमगाव तालुक्यांतील सारस अधिवास असलेल्या 53 ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी 15 अधिवास क्षेत्रांमध्ये 32 सारस पक्ष्यांची नोंद झाली. या प्रगणनेत स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, ‘सारस मित्र’, शेतकरी, स्थानिक प्रतिनिधी तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे 140 ते 150 जणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सारस पक्ष्यांचे अधिवास Gondia Sarus Crane असलेल्या पाणथळ जागा, नद्या, तलाव परिसर आणि शेतीक्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून ही गणना करण्यात आली. प्रगणना सुरळीत पार पडावी आणि सारस पक्ष्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नदीघाट परिसरातील मानवी हालचालींवर दोन दिवस मर्यादा घालण्याची विनंती जिल्हा पोलिस प्रशासनालाही करण्यात आली होती. बाघ आणि वैनगंगा या नद्या महाराष्ट्रातील गोंदिया व मध्यप्रदेशातील बालाघाट या दोन्ही जिल्ह्यांना जोडणार्‍या महत्त्वाच्या नद्या आहेत. या दोन्ही भागांतील हवामान, जमीन आणि शेती पद्धतीतील साम्यामुळे सारस पक्ष्यांची अनेक जोडपी अधिवास आणि अन्नाच्या शोधात दोन्ही राज्यांमध्ये मुक्तपणे संचार करीत असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. विशेषतः प्रजनन
न्यायालयाचे निर्देश अन् संवर्धनाकडे लक्ष...
दुर्मिळ सारस पक्ष्यांची नोंद सद्या विदर्भातील केवळ गोंदिया व भंडारा जिल्ह्यात असून न्यायालयाच्या निर्देशानंतर गोंदिया व भंडारा जिल्हा प्रशासनाने सारस संवर्धनाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली असून याचेच हे यश आहे.
वन विभाग, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून सुरू असलेले हे संयुक्त प्रयत्न भविष्यात सारस पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- सावन बहेकार, अध्यक्ष, सेवा संस्थान, गोंदिया