नागपूरच्या बजेटमध्ये ग्रीन टच; इको-फ्रेंडली बॅगची चर्चा

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Green touch in Nagpur's budget ग्रीन सिटी, क्लीन सिटी अशी ओळख असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा पर्यावरणपूरक विचारांची खास झलक पाहायला मिळाली. शनिवार, नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होत असताना आकडेवारी आणि विकास आराखड्यासोबतच एका खास गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी यंदा अंदाजपत्रक सादर करताना पारंपरिक सुटकेसला फाटा देत इको-फ्रेंडली बॅगची निवड केली. विशेष म्हणजे ही बॅग वेस्ट प्लास्टिक रिसायकलिंगमधून तयार करण्यात आली होती. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे अर्थसंकल्प सादरीकरणाला एक वेगळी ओळख मिळाली.
 
 
danis
 
वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पारंपरिक पद्धतीपासून वेगळा विचार मांडत शिवानी दाणी-वखरे यांनी पर्यावरण संवर्धनाचा स्पष्ट संदेश दिला. त्यांच्या या हटके अंदाजाने केवळ सभागृहाचेच नाही, तर संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा विकासकामांसोबतच पर्यावरणपूरक उपक्रमांनाही महत्त्व देण्यात आल्याचे या कृतीतून स्पष्ट झाले. अर्थसंकल्पासोबतच पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासाचा संदेश देत नागपूर महापालिकेने यंदा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.