दुसऱ्या टी-20 आधी 'या' 3 खेळाडूंचा पत्ता कट!

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India vs Ireland T20 भारत आणि आयर्लंड यांच्यात सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात मोठा धक्का बसला. 26 जून रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर आता मालिकेतील दुसऱ्या आणि निर्णायक सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे.पहिल्या सामन्यातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काही खेळाडूंची निराशाजनक कामगिरी संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या सामन्यात अत्यंत महागडी गोलंदाजी करत 4 षटकांत 57 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.

d4647
संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळू शकते. सध्या तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून आयपीएल आणि श्रीलंकेत झालेल्या तिरंगा मालिकेत त्याने दमदार कामगिरी केली आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी प्रिन्स यादवला वेगवान गोलंदाज म्हणून संधी मिळू शकते. आयपीएलमधील त्याची कामगिरी प्रभावी ठरली होती. तसेच वॉशिंग्टन सुंदरच्या जागी फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.दुसऱ्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग-11 अशी असू शकते — अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव. वॉशिंग्टन सुंदरलाही गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये प्रभाव पाडता आला नाही. त्याने 1 षटकात 19 धावा दिल्या, तर फलंदाजीत केवळ 9 धावांवर त्याची विकेट गेली. याशिवाय, संजू सॅमसनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो फक्त 4 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या सामन्यात तीन युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना 28 जून रोजी बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानावर खेळवला जाणार आहे. याच मैदानावर पहिला सामनाही पार पडला होता. भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी 6:00 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक 5:30 वाजता होणार आहे. आयर्लंडच्या स्थानिक वेळेनुसार हा सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल.