दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे के. भाग्यराज यांचे निधन

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
हैदराबाद,
K. Bhagyaraj passes away दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथाकार के. भाग्यराज यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.जवळपास पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत के. भाग्यराज यांनी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कामाची दखल केवळ तमिळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीत घेतली गेली.
 
 

ewr457 
भाग्यराज यांनी 1977 मध्ये १६ वयथिनिले या चित्रपटातून छोट्या भूमिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट भरतीराजा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला होता. त्यानंतर 1978 मध्ये 'सिगप्पू रोजाक्कल' मध्येही ते झळकले. विशेष म्हणजे या चित्रपटाचे संवादलेखनही त्यांनी केले होते.सुरुवातीच्या काळात त्यांनी भरतीराजा यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.'किझक्के पोगुम रेल' आणि इतर चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टिक टिक टिक' या चित्रपटाची पटकथाही त्यांनी लिहिली होती.