शेतात काम करत होती महिला; अचानक बिबट्याने घेतली अंगावर झेप

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
पुणे
leopard attack पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवण फराटा येथील गोकुळनगर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 
leopard attack, shirur, pune
 
गोकुळनगर येथील रहिवासी लिलाबाई बाळासाहेब फराटे या गुरुवारी (दि. २९) सायंकाळी नेहमीप्रमाणे आपल्या उसाच्या शेतात काम करत होत्या. सुमारे सात वाजण्याच्या सुमारास उजेड कमी झाला असताना, उसाच्या दाटीतून अचानक एक बिबट्या समोर आला. काही कळण्याच्या आतच त्याने थेट लिलाबाई यांच्यावर झडप घातली.या अचानक झालेल्या हल्ल्याच्या क्षणी लिलाबाई अजिबात घाबरल्या नाहीत. त्यांनी अत्यंत चपळाईने आणि प्रसंगावधान राखत स्वतःला पटकन बाजूला झुकवले. त्यांच्या या वेळी घेतलेल्या सावध हालचालीमुळे बिबट्याची ती प्राणघातक झडप हुकली आणि तो दुसऱ्या दिशेला वळला. अवघ्या काही सेकंदांत घडलेल्या या थरारक प्रसंगात त्यांच्या जीवावरचा धोका टळला.
या अनपेक्षित घटनेनंतर leopard attack  घाबरलेल्या अवस्थेत लिलाबाई यांनी कोणताही विचार न करता शेतातून तातडीने उलट्या पावली धाव घेत घर गाठले. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी हा संपूर्ण थरार आपल्या कुटुंबीयांना तसेच गावकऱ्यांना सांगितला.या घटनेमुळे लिलाबाईंचा अक्षरशः थरकाप उडाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गोकुळनगर आणि परिसरात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण पसरले असून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने या भागात पिंजरा लावून संबंधित बिबट्याला जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.