वाशीम - मंगरुळनाथ मतदार संघासाठी १५० अतिरिक्त रोहीत्र मिळाले

आ. खोडे यांच्या पाठपुराव्याला यश

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
वाशीम,
mla khode वाशीम - मंगरुळनाथ मतदार संघातील नागरीकांना अखंडीत व उच्च दाबाचा वीज पुरवठा मिळावा यासाठी अतिरिक्त रोहीत्र उपलब्ध करुन द्यावे, यासाठी आमदार श्याम खोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यासह वीज मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, १०० केव्ही ची १५० रोहीत्र मंजूर होवून प्रत्यक्ष वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात उपलब्ध झाले आहेत.
 
 

mla khode 
 
 
वाशीम -मंगरुळनाथ विधानसभा मतदार संघात कुठलेही मोठे उद्योग नाहीत. शेतीच्या भरोशावर नागरीकांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. मात्र, कृषी पंपाचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेकर्‍यांना सिंचन करतांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत होते. शेतकर्‍याकडुन मोठ्या प्रमाणात विजेची मागणी होत असल्याने कृषी वाहीन्यावर विजेचा दाब वाढल्याने रोहीत्रात वारंवार बिघाड होवून वीज पुरवठा खंडीत होतो. कृषी पंपाकरीता अखंडीत वीज पुरवठा मिळावा यासाठी १०० केव्हीएच्या १५० रोहीत्र उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आ. श्याम खोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री यांनी सदर प्रकरणी तात्काळ लक्ष घालुन वाशीम - मंगरुळनाथ मतदार संघाकरीता अतिरीक्त रोहीत्र उपलब्ध करुन देण्याच्या सुचना महावितरणला दिल्या.mla khode महावितरणने १०० केव्हीए चे १५० विद्युत रोहीत्र उपलब्ध करुन दिले आहेत.
आ. श्याम खोडे यांनी शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न सातत्याने लावून धरल्याने आज १५० रोहीत्र उपलब्ध झाले. त्यामुळे आगामी काळात शेतकर्‍यांना अखंडीत व उच्च दाबाचा वीज पुरवठा मिळेल, त्यांच्या सिंचनाची समस्या दूर होणार आहे. सदर रोहीत्र मंजूर होवून वाशीम वीज वितरण कंपनी प्रशासनाकडे उपलब्ध झाले आहेत.