आणीबाणीतील लोकशाहीच्या प्रहरींचा गौरव

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
भाजपा हिंगणघाट ग्रामीण मंडळाचे आयोजन
 
हिंगणघाट, 
period of the Emergency भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील २५ जून १९७५ हा दिवस स्वातंत्र्य, संविधानिक मूल्ये आणि लोकशाही हकांवर घाला घालणारा काळा दिवस म्हणून ओळखला जातो. तत्कालीन काँग्रेस सरकारने देशावर आणीबाणी लादून लोकशाही संस्थांवर निर्बंध आणले. विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर बंधने घातली. या घटनेची आठवण जागविण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणार्‍या राष्ट्रनिष्ठ सत्याग्रहींप्रती कृतज्ञता व्यत करण्यासाठी आ. समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपा हिंगणघाट ग्रामीण मंडळाच्या वतीने ‘संविधान हत्या दिन’ पाळण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किशोर दिघे प्रमुख वते म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आकाश पोहाणे, प्रफुल्ल बाडे उपस्थित होते.
 
 
Emergency
 
आणीबाणीच्या काळात मिसा कायद्यांतर्गत पोहणा येथील सत्याग्रही विठ्ठल कोल्हे यांना तब्बल १३ महिन्यांचा तर हिवरा येथील मोहन जगताप यांना ४ महिन्यांचा कारावास भोगावा लागला. तसेच वडनेर येथील वसंत आंबटकर, हिरामन मुरसे, शाम खत्री, पोहणा येथील रामचंद्र पवार, गंगाधर कोल्हे, दौलत जीवतोडे, मारोतराव शेळके, सुधाकर कोंबे, शेकापूर येथील देवराव मेघरे, प्रभाकर तिजारे, टेंभा येथील धनराज वरभे यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण यावेळी करण्यात आले.
 
 
 
यावेळी नगरसेवक तथा भाजपाचे नेते किशोर दिघे म्हणाले की, २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ हा कालखंड भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठ्या आघातांपैकी एक मानला जातो. प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप, विरोधी पक्षांच्या नेत्यांची धरपकड, न्यायव्यवस्थेवर दबाव आणि नागरिकांच्या अधिकारांचे हनन अशा अनेक घटनांनी हा काळ गडद झाला होता. मात्र अशा कठीण परिस्थितीतही हजारो राष्ट्रभक्त, कार्यकर्ते आणि सत्याग्रहींनी लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी केलेला संघर्ष भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविला गेला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष हिंगणघाट ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष विनोद विटाळे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष कीर्ती सायंकार, महामंत्री विकास इंगळे, महामंत्री विनोद राऊत, भारती महाकाळकर, अल्का पवार, वैशाली बालपांडे, युवा मोर्चा अध्यक्ष भूषण राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.