गडचिरोली,
Priyanka Oksa BSF selection जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे भामरागड येथील गुणवंत खेळाडू प्रियांका लालसू ओक्सा यांची सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये क्रीडा कोटा-2025 अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठी निवड झाली आहे. प्रियांकाला लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन अंतर्गत कार्यरत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीमार्फत व्यावसायिक प्रशिक्षण व प्रायोजकत्वाची मदत मिळाली असून, या संस्थेने परिसरातील क्रीडा प्रतिभेला घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
प्रियांकाचे हे यश तिच्या अथक मेहनतीचे, शिस्तीचे, चिकाटीचे आणि अनेक वर्षांच्या समर्पित प्रयत्नांचे फलित आहे. महाराष्ट्रातील दुर्गम आदिवासी भागातून पुढे येत तिने सिद्ध केले आहे की, योग्य मार्गदर्शन, संधी आणि जिद्द यांच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते.
आपल्या क्रीडा कारकिर्दीत प्रियांकाने सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे, समाजाचे, लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचे तसेच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. बीएसएफमधील तिची निवड ही केवळ तिची वैयक्तिक कामगिरी नसून, क्रीडेच्या माध्यमातून शासकीय सेवेत करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणार्या असंख्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल Priyanka Oksa BSF selection अभिनंदन करताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले, की, प्रियांकाचे यश आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. तिची मेहनत, शिस्त आणि समर्पणामुळेच तिला हे यश मिळाले आहे. तिचा प्रवास गडचिरोलीतील अनेक तरुणींना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी आणि राष्ट्रनिर्माणात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल, असा आम्हाला विश्वास आहे. लॉयड्स मेटल्स ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला संधी देण्यासाठी आणि युवकांना क्रीडेद्वारे त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीने प्रियांकाचे मनःपूर्वक अभिनंदन करत देशसेवेतील तिच्या उज्ज्वल आणि यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रियांका लालसू ओक्सा यांचे यश हे तळागाळातील क्रीडा विकासात केलेल्या नियोजनबद्ध गुंतवणुकीमुळे ग्रामीण युवक-युवतींसाठी राष्ट्रीय स्तरावर यशाची दारे खुली होऊ शकतात, याचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. तिच्या या यशामुळे गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.