मुंबई
sanchita ugale death ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत ‘दिया टंडन’ची भूमिका साकारून ओळख मिळवलेली अभिनेत्री संचिता उगळे हिच्यावर निधनानंतर तब्बल नऊ दिवसांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. २३ जून रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील तिच्या मूळ गाव डोंगरगाव येथे कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. अविवाहित व्यक्तींसाठी केली जाणारी पारंपरिक दशक्रिया विधीही कुटुंबीयांनी पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे.
१४ जून रोजी मुंबईतील तिच्या राहत्या घरी बंद खोलीत संचिता बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) केली असून, तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील सर्व बाबींचा तपास सुरू आहे.
दरम्यान, संचिताच्या sanchita ugale death वडिलांनी मनोरंजन क्षेत्रातील काही व्यक्तींनी तिच्यावर मानसिक दबाव आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच, तिचा चुलत भाऊ आकाश उगळे यानेही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, अभिनेत्री मेघा शर्मा हिने संचिता जानेवारी महिन्यापासून नैराश्याशी झुंज देत असल्याचे सांगत, उद्योगातील दबाव हेच तिच्या मानसिक स्थितीमागील एकमेव कारण नसल्याचे मत व्यक्त केले आहे.पोलिसांचा तपास अद्याप सुरू असून, संचिताच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही समोर आलेल्या चॅट्समधून ती आत्मविश्वासाचा अभाव, चिंता आणि नैराश्याशी संघर्ष करत असल्याचे संकेत मिळाल्याचे वृत्त आहे. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत तिच्या मृत्यूबाबत कोणताही ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.