कर्णधार होताच श्रेयस चमकला!

पहिल्याच सामन्यात मोठी नोंद

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Shreyas Iyer impressive upon becoming भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना बेलफास्टमध्ये खेळवण्यात आला, आणि या सामन्यात भारतीय संघासाठी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. श्रेयस अय्यर पहिल्यांदाच टीम इंडियाचा टी-20 कर्णधार म्हणून नाणेफेकीसाठी मैदानात उतरला. सूर्यकुमार यादव यांच्या जागी त्याच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली.कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यरने मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याचा विक्रम त्याने मोडला. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्मा यांच्या नावावर होता.
 
 

श्रेयस  
बीसीसीआयने भविष्यातील टी-20 संघबांधणी लक्षात घेऊन श्रेयस अय्यरची नव्या कर्णधारपदी निवड केली आहे. तब्बल 936 दिवसांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन करणाऱ्या श्रेयसने पहिल्याच सामन्यात विक्रमाची नोंद केली.श्रेयस अय्यरने भारतीय संघाचे टी-20 कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी 114 टी-20 सामने खेळले होते. त्यामुळे तो सर्वाधिक टी-20 सामने खेळल्यानंतर भारताचा कर्णधार बनलेला खेळाडू ठरला आहे. याआधी रोहित शर्माने 80 टी-20 सामने खेळल्यानंतर ही जबाबदारी स्वीकारली होती. या यादीत विराट कोहली 72 सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर केएल राहुल ४२, ऋषभ पंत ३० आणि शिखर धवन २१ सामन्यांसह आहेत.
 
श्रेयस अय्यरने वयाच्या 31 वर्षे आणि 202 दिवसांनी भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व करत मैदानात पाऊल ठेवले. यामुळे तो भारताचा टी-20 मध्ये पदार्पणात कर्णधारपद भूषवणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.या यादीत शिखर धवन अव्वल स्थानी आहे. त्याने 35 वर्षे आणि 232 दिवसांच्या वयात प्रथमच टी-20 मध्ये भारताचे नेतृत्व केले होते. दुसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव असून त्याने 33 वर्षे आणि 70 दिवसांच्या वयात ही जबाबदारी स्वीकारली होती. आता श्रेयस अय्यर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानंतर रोहित शर्मा 30 वर्षे 234 दिवस आणि केएल राहुल 30 वर्षे 143 दिवसांसह पुढे आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.