हावरापेठमध्ये श्रीमद् भागवत कथा सोहळा

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |

नागपूर,
shrimad bhagwat katha हावरापेठ मार्ग क्र. २ येथील सुनील देशमुख यांच्या निवासस्थानी स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त १९ जून ते २६ जून दरम्यान श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम श्रद्धाभावाने पार पडले. या कथा सोहळ्याच्या प्रवक्त्या ह.भ.प. सुश्री मंगला देशमुख (खामगाव) यांनी आपल्या रसाळ वाणीने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. प्रवचनादरम्यान त्यांनी सांगितले की, जोपर्यंत मनुष्य शरीरातील सहा विकार - काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर- दूर करत नाही, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही.


shrimad bhagwat katha

तसेच, गोकुळातील गोपींप्रमाणे निःस्वार्थ प्रेमाने भगवंताची भक्ती केल्यास जीवनातील कोणतेही संकट सहज पार करता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या भक्तिमय वातावरणात संपूर्ण देशमुख परिवार तसेच त्यांचे हितचिंतक भक्तिरसात न्हाऊन निघाले. सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी महाआरती, दहीकाला आणि प्रसाद वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवा देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन भावना देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील देशमुख, अनिल देशमुख, शशिकला देशमुख, भारती देशमुख, सुनिता गायकवाड, माधुरी मेहर, माया कोरडे, इंदू कटनकर, ममता भक्ते, माया भक्ते आणि माधुरी गायकी यांनी विशेष परिश्रम घेतले. भागवत कथा श्रवणासाठी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेत

सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र