दुबेची दमदार एंट्री; हार्दिक-संजूला टाकले मागे

सर्वात जलद 1000 धावा करणारा तिसरा भारतीय

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Strong entry by Dubey शिवम दुबे याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयर्लंडविरुद्ध बेलफास्ट येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने आपल्या कारकिर्दीतील 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला. या सामन्यात 9 धावा पूर्ण करताच दुबेने हा महत्त्वाचा मैलाचा दगड गाठला आणि भारतीय क्रिकेटमधील खास यादीत स्थान मिळवले.या कामगिरीसह शिवम दुबे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा भारताचा तिसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. त्याने हा टप्पा केवळ 648 चेंडूंमध्ये गाठला. यामुळे हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन यांना त्याने मागे टाकले. हार्दिक आणि संजू यांनी प्रत्येकी 679 चेंडूंमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.
 
 
 
Dubey शिवम
विक्रम अभिषेक शर्मा हा भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज आहे. त्याने ५२८ चेंडूंमध्ये हा टप्पा ओलांडला. त्यानंतर सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने ५७३ चेंडूंमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. शिवम दुबेची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द आतापर्यंत प्रभावी राहिली आहे. त्याने 65 सामन्यांमध्ये 49 डावांत फलंदाजी करत 30.78 च्या सरासरीने 1,016 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 154.64 इतका प्रभावी राहिला आहे. आपल्या कारकिर्दीत त्याने 6 अर्धशतके झळकावली असून 65 चौकार आणि 65 षटकार लगावले आहेत. विशेष म्हणजे, तो भारताच्या 2024 आणि 2026 च्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचाही महत्त्वाचा सदस्य राहिला आहे.
 
 
भारत आणि आयर्लंड सामन्याकडे पाहिल्यास, 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था बिकट झाली होती. अवघ्या 90 धावांत भारताचे 5 गडी बाद झाले होते. अशा कठीण परिस्थितीत शिवम दुबे मैदानात उतरला. दबावाखाली त्याने अक्षर पटेलसोबत सातव्या विकेटसाठी 35 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. दुबेने आक्रमक शैलीत फलंदाजी करत 14 चेंडूंमध्ये 25 धावा केल्या. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. मात्र 16व्या षटकात आयर्लंडचा गोलंदाज जय मुंद्राने स्वतःच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेत दुबेला माघारी धाडले. दुबेची झुंजार खेळी असूनही भारताला विजय मिळवता आला नाही.