शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत लष्कराचे दहशतवादी!

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
इस्लामाबाद,
errorists at Shoaib Akhtar's brother's funeral माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांचा मोठा भाऊ शाहिद अख्तर यांच्या अंत्यविधीनंतर पाकिस्तानात नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओ आणि छायाचित्रांमुळे अंत्यसंस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या काही व्यक्तींवरून मोठी चर्चा रंगली आहे.अंत्यसंस्कारानंतर सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये पाकिस्तान सेंट्रल मुस्लिम लीग (PMML) शी संबंधित काही नेते आणि कार्यकर्ते प्रार्थनेत सहभागी झाल्याचे दिसून आले. यामध्ये इनाम-उर-रहमान कंबोह, अब्दुल्ला तूर, हाफिज उमर आणि अमजद भट्टी यांसारख्या नावांची चर्चा सुरू आहे.
 
 
Akhtar
 
शाहिद अख्तर यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर इस्लामाबादमधील H-8 स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी क्रीडा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपस्थितीमुळे पाकिस्तानात काही संघटनांशी संबंधित व्यक्तींना मिळणाऱ्या कथित संरक्षणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, शोएब अख्तर यांनी भावाच्या निधनाबाबत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मोठ्या भावाच्या निधनाची माहिती देत अंत्यविधीबाबत माहिती दिली होती. मात्र, अंत्यविधीतील उपस्थितांवरून निर्माण झालेल्या वादावर त्यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.