जिल्ह्यातील ११ केंद्रांवर ४,९६३ विद्यार्थी परीक्षा देणार होते.
वर्धा,
TET Exam शिक्षकांना पदोन्नती आणि इतर नोकर्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ११ केंद्रांवरून रविवार २८ रोजी ४,९६३ विद्यमान आणि भावी शिक्षक परीक्षा देणार होते. प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रद्द करण्याचा आदेश निघाल्यानंतर शिक्षकांनी संताप व्यत केला.
नवीन नेमणुका, पदोन्नती आणि शिक्षण-संबंधित सर्व कामांसाठी शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही परीक्षा गेल्या वर्षी घेण्यात आली होती. २८ रोजी परीक्षा होण्यापूर्वीच ४,९६३ विद्यार्थी मानसिक तणावाखाली होते. २७ जून रोजी मुंबईत पेपरफुटी झाल्याची माहिती मिळाली. जिल्हा प्रशासनाने टीईटी परीक्षेसाठी अत्यंत काळजीपूर्वक तयारी केली होती. ही परीक्षा शहररातील ११ केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. कर्मचार्यांसोबतच, सीसीटीव्ही कॅमेरे, फिंगरप्रिंट मशीन आणि फेस-स्कॅनिंग बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आले होते. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने जिल्हा प्रशासनाची तयारी निष्फळ ठरली आहे.