मी मतदारांची माफी मागायला आलोय : उद्धव ठाकरे

    दिनांक :27-Jun-2026
Total Views |
वाशीम, 
Uddhav Thackeray मी मतदारांची माफी मागायला आलोय. आगामी निवडणुकीत अशा पक्षांतर करणार्‍या खासदारांना गाडून टाका, असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी जनतेसमोर आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रतिसाद दिला.
 
 
Uddhav Thackeray
 
वाशीम येथे २७ जून रोजी जैन भवन अकोला नाका येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करणयात आले होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना प्रवक्ता संजय राऊत, आदीत्य ठाकरे, खा. अरविंद सावंत, वाशीम जिल्हा प्रमुख बालाजी वानखेडे, सुधीर कवर, डॉ. सिध्दार्थ देवळे, यांच्यासह आजी, माजी पदाधिकार्‍यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. वाशीममधील सभेत त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. फुटीर खासदार संजय देशमुख मुलीच्या सोयरीकीचे कारण सांगून बैठकीला गेले, अशी टीका त्यांनी केली. पक्षफोड, राजकीय घडामोडी आणि विरोधकांवरही यावेळी त्यांनी टीका केली.
 
 
स्व. बाळासाहेबांच्या हाताने या वाशीम जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. त्यामुळे वाशीम हा सेनेचा गढ असून, यापूढे पक्ष सोडणार्‍यांना थारा देवू नका. आमचे धनुष्यबाण चोरले, पक्ष चोरला, वडीलही चोरले तरी लोकसभेमध्ये नऊ खासदार निवडुण आले. पक्ष सोडुन गेलेल्या खासदारांवर टीका करतांना उध्दव ठाकरे म्हणाले की, या सर्व खासदारांच्या निवडणुक प्रचारासाठी त्यांनी स्वतः दौरे केले होते. शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांवरील विश्वासामुळे मतदारांनी त्यांना निवडुण दिले होते, असेही शेवटी उध्दव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना बंडखोरांविरोधात आक्रमक होण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, पक्षांतर करणार्‍या खासदार तुम्हाला जिथे दिसेल, तिथे थांबवून त्याला जाब विचारा! वाशीम - यवतमाळचे विद्यमान खासदार संजय देशमुख यांच्यासह शिवसेनेच्या पाच खासदारांनी केलेल्या पक्षांतराचा संदर्भ देत त्यांनी बंडखोरांचा खरपूस समाचार घेतला. सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.