नागपूर,
Polio free India पोलिओमुक्त भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गौरवपटका पोलिस ठाण्यामागील हुडको कॉलनी येथील माधुरी कॉन्व्हेंटमध्ये आयोजित पोलिओ लसीकरण केंद्रावर २३१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले.
या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर विश्वनाथ गभणे यांच्या हस्ते वैदेही मोहन दुधे या बालिकेला पोलिओ डोस पाजून करण्यात आला.Polio free India यावेळी त्यांनी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन केले.
सौजन्य: संजय खोब्रागडे,संपर्क मित्र