१९ गोवंशीय जनावरांचा ट्रक ताब्यात

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
कारंजा बहिरम येथे कारवाई
 
अमरावती, 
Truck carrying cattle seized कारंजा बहिरम परिसरात एक ट्रक पकडून पोलिसांनी १४ गोवंशीय जनावरांची सुटका केली तर ५ जनावरे मृतावस्थेत आढळली. २६ जून रोजी शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना नजीकच्या कारंजा बहिरम येथून मालूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून गोवंशीय जनावरे कत्तलीकरिता नेल्या जात असल्याची माहिती मिळाली.
 
 
govanshi
 
त्यानुसार पंचांसमक्ष जाऊन कारवाई केली असता, एक आयशर कंपनीचा ट्रक आढळला. त्याची पाहणी केली असता त्यात गोवंश जातीची जनावरे निर्दयतेने दोरीने बांधून नेत असल्याचे निदर्शनास आले. सदर ट्रकमधील गोवंश जनावरे पंचांसमक्ष ट्रकमधून बाहेर काढली असता ट्रकमध्ये एकूण १९ जनावरे आढळली. त्यापैकी ५ जनावरे मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी ट्रकसह जनावरे व आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक अमन शिरसाट, उपनिरीक्षक प्रशांत जाधव, कर्मचारी रमेश आठवले, दीपक गवई, अमोल नंदरधने यांनी केली.