धामणगाव रेल्वे,
samruddhi mahamarg अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर चारचाकीच्या भीषण अपघाताची घटना दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृतक चंद्रपूरचे असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला एका मुलगीचा समावेश आहे.
समृद्धी महामार्ग चैनल नंबर 105 च्या नजीक हा अपघात झाला. सुझुकी इग्निस या चारचाकी गाडीने हे पाचही जण जात होते. मार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला ही चारचाकी धडकल्याने हा अपघात झाला. माहिती मिळतात संबंधित सर्व यंत्रणा घटनास्थळावर पोहोचल्या. मृतकांमध्ये आरती जीवणे, भास्कर जीवणे, महादेव जीवणे, लता जीवणे व कृष्णा जीवणे सर्व रा. चंद्रपूर यांचा समावेश आहे.