अफगाणिस्तानात ६.२ तीव्रतेचा भूकंप

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
अफगाणिस्तान
afghanistan earthquake अफगाणिस्तानातील हिंदू कुश पर्वतरांगांमध्ये शनिवारी संध्याकाळी रिश्टर स्केलवर ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला असून, त्याचे धक्के भारतातील जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआरसह पाकिस्तानातही जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील कालाफगानपासून सुमारे ८१ किलोमीटर अंतरावर होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची नोंद जमिनीखाली २१५ किलोमीटर खोलीवर करण्यात आली.
 

afghanistan earthquake 
या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, चीन आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये जाणवले. उत्तर पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातही नागरिकांनी भूकंपाचे धक्के अनुभवल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने, या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. 
भारतात या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआरसह जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले. तसेच हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील काही भागांमध्येही भूकंपामुळे सौम्य हादरे बसल्याची नोंद करण्यात आली.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये गेल्या २४ तासांत चार भूकंपांची नोंद झाली आहे. वृत्तानुसार, शुक्रवारी अवघ्या २४ तासांच्या कालावधीत चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवले असून, त्यापैकी सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप ५.५ रिश्टर स्केलचा होता. त्यानंतर शनिवारी सकाळी ८.३६ वाजता पुन्हा एकदा तीव्र भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानातील बलुचिस्तान भागात असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
दुसरीकडे, व्हेनेझुएलामध्ये afghanistan earthquake बुधवारी लागोपाठ झालेल्या दोन भूकंपांमुळे झालेल्या जीवितहानीचा आकडा सातत्याने वाढत असून, आतापर्यंत ५८९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. याशिवाय, शुक्रवार सकाळपर्यंत तब्बल ५० हजार नागरिक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. भूकंपग्रस्त भागांमध्ये बचाव आणि मदतकार्यासाठी परदेशी पथके दाखल झाली असून, राजधानी काराकास आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये दुहेरी भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. अनेक इमारती आणि इतर बांधकामे जमीनदोस्त झाली असून, ढिगाऱ्याखाली अजूनही शेकडो नागरिक अडकल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. आतापर्यंत ५८९ मृत्यूंची अधिकृत पुष्टी झाली असून, २,९८० जण जखमी झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.