रौंद्ररूप धारण करणार्‍या अरुणावती नदीकिनारी संरक्षक भिंत कधी बांधणार

शहरवासीयांचा प्रश्न

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
मानोरा,

arunavati river शहरातील जुन्या वस्तीतून वाहणार्‍या अरुणावती नदीला पावसाळ्यात पूर आल्यावर त्या पुराचे पाणी थेट वस्ती आणि आजूबाजूच्या बाजारपेठेत शिरते. त्यामुळे नागरिकांसोबतच व्यापार्‍यांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. पूर सुरक्षा भिंत आणि सुरक्षित घाट बांधण्याचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दखल घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
 

arunavati river, manora, flood protection wall, monsoon flood, river safety, maharashtra news, infrastructure demand, urban flooding, local news, public safety 
नदी किनारी असलेल्या गणपती मंदिराच्या पायर्‍यांवर गणेशोत्सवाच्या वेळी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. पण, पूर सुरक्षा भिंत नसल्याने विसर्जनाची प्रक्रिया धोकादायक बनली आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीच्या पातळीत वाढ झाल्यावर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. दरवर्षी पूरस्थितीमुळे येथे भीतीचे वातावरण असते. नागरिकांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेकदा शासन आणि लोकप्रतिनिधींकडे मागणी केली आहे. पूर सुरक्षा भिंत आणि सुरक्षित घाट बांधण्याची मागणी वर्षानुवर्षे लांबणीवर पडली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, या समस्येचे गांभीर्य प्रशासनाला माहीत आहे, पण अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. स्थानिक नागरिकांच्या मते, दरवर्षी पुरामुळे निर्माण होणार्‍या नुकसानीपासून वाचण्यासाठी तातडीने पूर सुरक्षा भिंत आणि सुरक्षित घाट बांधणे आवश्यक आहे. सध्या नागरिकांचे लक्ष प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या पुढील पावलांकडे लागले आहे.
छायाचित्र - नदीच्या याच काठावर पुर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी होत आहे.