खाकीचा धाक दाखवत नागरिकांची उघड लूट

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
मुंबई,
citizens openly fleeced मुंबई मध्ये बनावट पोलीस बनून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलीसगुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून हे आरोपी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांकडून पैसे उकळत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, आरोपींनी अशा एका पोलीस युनिटची बनावट ओळखपत्रे तयार केली होती, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. या बनावट ओळखपत्रांच्या आधारे ते स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून सादर करत होते. आरोपींकडे पोलीस गणवेश, वाहनांवरील पोलीस स्टिकर्स, काठ्या आणि बनावट रिव्हॉल्व्हरही आढळून आले.
 
citizens openly fleeced
 
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी लोकांना बँक कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते. सरकारी ओळख आणि पोलीस पदाचा धाक दाखवून ते नागरिकांचा विश्वास संपादन करत आणि त्यानंतर मोठ्या रकमेची उकळपट्टी करत होते. या कारवाईदरम्यान आरोपींकडून बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील एका आरोपीवर यापूर्वीही फसवणूक आणि बनावटगिरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, साकीनाका पोलीस ठाणे आणि खेरवाडी पोलीस ठाणे येथेही गुन्हे नोंद आहेत.
 
या प्रकरणी सहार पोलीस ठाणे येथे विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.