काँक्रोच जनता पार्टीचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
Cockroach Janata Party कथित नीट पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेच्या निषेधार्थ, काँक्रोच जनता पार्टीचे आणि युवा क्रांती यांच्या संयुत वतीने आज रविवारी वर्धेत आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध भागांतील शेकडो विद्यार्थी आणि तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते.
 
 
Cockroach Janata Party
 
पेपरफुटीमुळे लाखो तरुणांचे भविष्य धोयात आले आहे. अनेक वर्षांची मेहनत घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द होणे आणि अनियमिततेचे परिणाम भोगावे लागत आहेत. परीक्षा पद्धती पूर्णपणे पारदर्शक करण्याची, पेपरफुटीस जबाबदार असलेल्यांवर खटला चालवण्याची आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणीही यावेळी केली. काँक्रोच जनता पार्टीचे वर्धा अध्यक्ष रुत्विक रामटेके याच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले होते. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा होत नाही, तोपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी एकमताने सांगितले. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.