कॉकटेल २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
मुंबई
cocktail 2 शाहिद कपूर, क्रिती सेनन आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित ‘कॉकटेल २’ हा रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. १९ जून रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता आठ दिवसांच्या टप्प्यावर पोहोचला असून, त्याची कमाई सातत्याने वाढताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत तीन महत्त्वपूर्ण विक्रमांची नोंद केल्याचे समोर आले आहे.
 

cocktail 2 box office collection 
कोइमोईच्या अहवालानुसार, ‘कॉकटेल २’ने जागतिक बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत एकूण १२७.९५ कोटींचा गल्ला जमवला आहे. यामध्ये भारतातील कलेक्शन ९२.९९ कोटी इतके असून, परदेशातील कमाई ३४.९६ कोटी इतकी नोंदवली गेली आहे. ‘वेलकम टू द जंगल’ प्रदर्शित झाल्यानंतरही या चित्रपटाने आपली बॉक्स ऑफिसवरील पकड कायम राखल्याचे दिसून येत आहे.
प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी ‘कॉकटेल २’ने १२३.३८ कोटींच्या कमाईसह २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या सैफ अली खानच्या ‘कॉकटेल’ या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. याशिवाय, शाहिद कपूर, क्रिती सेनन आणि रश्मिका मंदाना यांच्या या चित्रपटाने २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही स्थान मिळवले आहे.
शाहिद कपूरच्या कारकिर्दीतही cocktail 2 या चित्रपटाने महत्त्वाचा टप्पा गाठला असून, कोइमोईच्या माहितीनुसार ‘ओ रोमियो’ (१२३.१ कोटी)ला मागे टाकत ‘कॉकटेल २’ त्याच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यानुसार शाहिद कपूरच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘पद्मावत’ ५६० कोटींसह पहिल्या क्रमांकावर असून ‘कबीर सिंग’ ३६८.३ कोटींसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ १३३.६४ कोटी, ‘कॉकटेल २’ १२७.१ कोटी आणि ‘ओ रोमियो’ १२३.१ कोटी असा क्रम दिसून येतो.यासोबतच ‘कॉकटेल २’ने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी करत २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. या यादीत ‘धुरंधर २’ १८५०.८५ कोटींसह अव्वल स्थानी असून ‘बॉर्डर २’ ४८५.३ कोटी आणि ‘भूत बंगला’ २९२.६४ कोटींसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर ‘कॉकटेल २’ १२७.९५ कोटी, ‘ओ रोमियो’ १२३.१ कोटी, ‘है जवानी तो इश्क होना है’ ८४.५३ कोटी, ‘पती पत्नी और वो दो’ ७७.८१ कोटी, ‘मर्दानी ३’ ७७.१२ कोटी, ‘द केरला स्टोरी २’ ६१.२५ कोटी आणि ‘आय विल कम बॅक’ ५१.४४ कोटी अशी क्रमवारी नोंदवण्यात आली आहे.