मुंबई
daryabhavani मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कथानकांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवाजी अष्टक’ मालिकेतील सातव्या चित्रपट ‘दऱ्याभवानी’चा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, लांजेकरांच्या आगामी भव्य प्रोजेक्टबाबत चर्चेला वेग आला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागर सामर्थ्यावर आणि आरमारावर आधारित हा चित्रपट १५ जानेवारी २०२७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे
‘शिवाजी महाराज’ आणि त्यांच्या काळाशी संबंधित ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची मालिका उभारणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांनी या नव्या चित्रपटाद्वारेही त्याच परंपरेला पुढे नेले आहे. ‘दऱ्याभवानी’ हा त्यांच्या महत्त्वाकांक्षी सिनेमॅटिक विश्वातील सातवा भाग असून, नुकत्याच समोर आलेल्या पहिल्या लूकमुळे चित्रपटाची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.या पोस्टरच्या प्रकाशनानंतर सोशल मीडियावर चित्रपटाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून, लांजेकरांच्या ‘शिवाजी अष्टक’ मालिकेतील पुढील भाग कसा असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. ऐतिहासिक मांडणी, भव्य दृश्यांकन आणि मराठ्यांच्या पराक्रमाची कथा यामुळे ही मालिका नेहमीच daryabhavani चर्चेत राहिली आहे.दरम्यान, ‘दऱ्याभवानी’च्या कथानकाबाबत किंवा कलाकारांबाबत निर्मात्यांकडून अद्याप सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र पोस्टर रिलीजमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून, हा चित्रपट ‘शिवाजी अष्टक’ मालिकेत आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडणार असल्याचे मानले जात आहे.